34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगदेशातील पहिली सीएनजी बाईक लवकरच होणार लॉँच

देशातील पहिली सीएनजी बाईक लवकरच होणार लॉँच

नवी दिल्ली : तुम्ही पेट्रोलवर चालणा-या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आणि पाहिले आहे. पण आता लवकरच भारतीय बाजारात सीएनजीवर चालणारी बाईक येणार आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच भारतातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करणार आहे. हे बजाज प्लॅटिना ११० मॉडेल असेल. चाचणीदरम्यान ही बाईक अनेकदा स्पॉट झाली आहे. आता लवकरच ही बाईक प्रत्यक्षात विक्रीस उपलब्ध होईल.

ही बाईक सन २०२५ वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होणार होती असे आधी सांगितले जात होते. पण, आता कंपनीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ही बाईक लॉन्च केली जाईल. या बाईकची किंमत सुमारे ८० हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. दरम्यान, या बाईकचे मायलेज सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅटिनापेक्षा (७५-९०किमी) जास्त असेल.

कशी असेल सीएनजी बाईक?
ही सीएनजी बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅटिनासारखीच असेल. फक्त, यात इंधन टाकीऐवजी सीएनजी सिलिंडर मिळेल असे म्हटले जात आहे की, बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी असू शकते, जी बाईकचे सीएनजी रिकामे झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल, या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिंग लाइट्सही मिळू शकतात. बाकी इंजिनची पॉवर आणि इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR