लष्करच्या दोन दहशतवाद्यांना घेरले

शोपियान : जम्मू-कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रात्रभर थांबवलेली मोठी दहशतवादविरोधी मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरू केली आहे. लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संघटनेचे दोन दहशतवादी एका बागेत लपून बसले असून सुरक्षा दलांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले आहे.

दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. हिंदुस्थानी लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे शोपियानच्या मीमंदर भागात कडक नाकेबंदी केली आहे. शुक्रवारी पाळत ठेवणा-या कॅमे-यांमध्ये हे दहशतवादी पहिल्यांदा दिसले होते. अडकलेल्या या दोन दहशतवाद्यांची नावे झाकीर आणि लतीफ अशी असून, ते दोघेही दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. झाकीर हा २०२४ पासून लश्कर-ए-तोयबाशी जोडलेला आहे, तर लतीफ गेल्या वर्षीच या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती सुरक्षा अधिका-यांनी दिली. यातील झाकीर गनी हा सुरक्षा यंत्रणांच्या यादीत ए++ श्रेणीतील अत्यंत धोकादायक दहशतवादी म्हणून वर्गीकृत आहे. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये वॉन्टेड असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये कुलगाममधील एनआयए न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जाहीर नोटीस देखील जारी केली होती.

बागांमधील झाडे अतिशय दाट असून अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी पळून जाऊ नये, म्हणून लष्कराच्या विशेष काउंटर-इर्न्जन्सी युनिट व्हिक्टर फोर्सने अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. रात्रीच्या वेळी दहशतवाद्यांना अंधाराचा फायदा मिळू नये म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर हाय-तीव्रतेच्या दिव्यांनी प्रकाशमय केला आहे.

शनिवारी रात्रीपासून काय घडले?
सुरक्षा दलांची तुकडी जेव्हा या भागाचा शोध घेत पुढे जात होती, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक सुरू झाली. सुरुवातीला दोन्ही दहशतवादी मारले गेले आहेत, असे वृत्त आहे. मात्र, रविवारी अधिका-यांनी स्पष्ट केले की, दोघेही अजून जिवंत असून बागेतच अडकले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा दलांनी शनिवार संध्याकाळपर्यंत आसपासची चार गावे रिकामी करून सुरक्षित केली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26
Video thumbnail
निलंग्यात सावकारांचा नंगा नाच! शेतकऱ्यांचे अपहरण करून मारहाण?अर्धं गाव रिकामं... नेमकं काय घडतंय?
09:40
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07

Latest news