दोन दहशतवाद्यांना कंठस्रान

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ही चकमक मंगळवारपासून सुरू होती. तसेच दहशतवादी घनदाट जंगलातील गुहेमध्ये लपून सुरक्षा दलांना आव्हान देत होते. हे दोन्ही दहशतवादी वसंतगड परिसरातील गुहेमध्ये लपून बसलेले होते. तसेच या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये सीआरपीएफ आणि सीआयएफ डेल्टाचे जवानसुद्धा सहभागी झाले होते.

या दहशतवाद्यांनी मंगळवारी रामनगरमधील जाफर जंगलात सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. सुमारे एक तास चाललेल्या या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला गोळी लागली होती, मात्र तो त्याच्या सहका-यासह गुहेमध्ये जाऊन लपला. या गुहेत जाण्यासाठी दोन रस्ते होते. त्यातील एक रस्ता सुरक्षा दलांनी स्फोट घडवून उद्ध्वस्त केला. त्यानंतर जवानांची अतिरिक्त कुमक पाठवून परिसराला घेराव घालण्यात आला.

या चकमकीबाबत व्हाईट नाईट कोअरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, ही कारवाई गोपनिय माहितीवर आधारित होती. यात जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून दहशतवाद्यांचा शोध घेतला परिसरारा घेराव घातला. मंगळवारी संध्याकाळी अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, पुन्हा एकदा गोळीबार आणि स्फोटाचे आवाज आले. तसेच सुरक्षा दलांनी आपला बंदोबस्त अधिकच चोख केला. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चरचा वापरही केला. तसेच गुहेमध्ये ड्रोन पाठवून दहशतवादी जिवंत आहेत की मृत याची चाचपणी करण्यात आली. तसेच कुठलाही धोका उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचे
व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली. यामध्ये सांगितले की, ऑपरेशन किया अचूक गुप्त माहितीवर आधारित होते आणि सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित केला आणि त्यांना प्रभावीपणे वेढले. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे होते. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे. उधमपूर आणि आसपासच्या डोंगराळ भागात काही काळापासून दहशतवादी कारवायांच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे ही कारवाई सुरक्षेसाठी एक मोठे यश मानले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03

Latest news