अमेरिकेच्या ग्रीन कार्ड मंजुरीत ३५ टक्क्यांची घट

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, ग्रीन कार्डच्या मंजुरीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. असाधारण कौशल्य असलेल्या कामगारांसाठी असलेल्या ईबी-१ ए ग्रीन कार्डच्या मंजुरीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या दोन तिमाहींत सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीय अर्जदारांवर झाला आहे.

‘बाउंडलेस इमिग्रेशन’ने अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाकडे दाखल झालेल्या अर्जांच्या आधारे ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय अर्जदारांच्या ईबी-१ए अर्जांना मंजुरी मिळण्याचे प्रमाण ४९.१ टक्के होते. मात्र, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या दोन तिमाहींत हे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. आकडेवारीनुसार, एफवाय २५ मध्ये भारतीयांनी एकूण १४, २५० अर्ज दाखल केले. त्यापैकी ६ हजार ९९३ अर्ज मंजूर, तर १ हजार ४७४ अर्ज नाकारण्यात आले.

एफवाय २६ च्या पहिल्या दोन तिमाहींत भारतीयांकडून ७ हजार ३१६ अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी २,५७१ अर्ज मंजूर , तर १, १३१ अर्ज नाकारण्यात आले. ही घट विशेषत: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांमध्ये दिसून येत असल्याचे स्थलांतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ईबी-१ए श्रेणीत मोठ्या संख्येने अर्ज करणा-या भारतीयांनंतर चिनी अर्जदारांचा क्रमांक लागतो. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या काळात स्थलांतर धोरणे अधिक कठोर होत असताना ईबी-१ए मंजुरीतील ही घट दिसून येत आहे. ‘गॅनी लॉ ग्रुप’चे वरिष्ठ वकील जोएल यानोविच यांच्या मते, कायद्यात कोणताही बदल झालेला नसतानाही अर्ज तपासणा-या अधिका-यांकडून अर्जदारांसाठी अधिक कठोर आणि अवास्तव निकष लावले जात असल्याचे दिसते.

उच्च वेतन आता प्राथमिक निकष
बाउंडलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिओ वांग यांच्या मते, यूएससीआयएसच्या दहा निकषांपैकी केवळ तीन निकष पूर्ण करणे आता पुरेसे ठरत नाही. प्रतिष्ठित संस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणे किंवा उच्च वेतन मिळवणे यांसारख्या बाबी आता प्राथमिक निकष मानल्या जात आहेत. त्यासोबत आणखी एखादा उच्च-गुणवत्तेचा निकष पूर्ण करणे आवश्यक ठरत आहे.

कॅनडा आणि ब्रिटनचा पर्याय
अमेरिकेतील ईबी-२ आणि ईबी-३ श्रेणीतील प्रलंबित अर्जांचा बॅकलॉग १५ वर्षांपर्यंत वाढल्याने, आता भारतीय नागरिक पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत. यामध्ये ईबी-१सी हा एक पर्याय आहे. या श्रेणीसाठी व्यवस्थापक किंवा कार्यकारी अधिकारी म्हणून परदेशात किमान एक वर्ष काम करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. याशिवाय गुंतवणुकीवर आधारित ईबी-५ मार्गाकडेही, भारतीय अर्जदारांचा कल वाढत आहे. तसेच कॅनडा आणि ब्रिटनमध्ये प्रतिभावान व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या व्हिसा पर्यायांचाही भारतीयांकडून विचार केला जात आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news