24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?

भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?

  बच्चू कडूंचा रोखठोक सवाल

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. गेल्या काही वर्षांत ईडीने एकाही भाजपाच्या नेत्यावर कारवाई केल्याचे माहिती नाही. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपाला सवाल विचारला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही? याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, ‘समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) ताळ्यावर आणले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडले पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचे काहीच बरे-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.’

तुम्हाला असे वाटते का की, जे लोक खरे बोलतात, त्यांच्यामागे ईडी लावली जाते? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण भाजपावाल्यांना माझा प्रश्न आहे. माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR