जगण्याला उभारी देण्याची क्षमता स्त्रियांमध्ये : प्रा. डॉ. कदम

सेलू : अडचणीच्या काळातही आनंदाने जीवन जगायचे सामर्थ्य ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीतील स्त्रियांच्या जीवन जाणीवेतून आणि त्यांच्या संघर्षपूर्ण व्यक्तिमत्त्वातून मांडल्याचे प्रा. डॉ. सखाराम कदम यांनी अधोरेखित केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलूच्या वतीने दि. २३ रोजी आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमातील ४२वे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय माकोडे होते. यावेळी कादंबरीवर बा. बा .कोटंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. डॉ. कदम म्हणाले की, ‌ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीत १९७२च्या दुष्काळी परिस्थितीचे स्तिमित करणारे चित्रण कादंबरीकार कोटंबे यांनी मांडले आहे. जगण्याला उभारी देण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे. त्या कितीही मोठ्या संकटाला न डगमगता धैर्याने उभे राहून नेटाने संसार करतात.

या कार्यक्रमांत ग्रंथालयाचे वाचक केंद्र प्रमुख दत्तात्रय यादव, कृष्णा शिंदे विजय तुरकर, धनंजय ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दिलीप डासाळकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय आवटे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल बिडवे यांनी केले. कार्यक्रमास माणिक पुरी, हनुमान व्हरगुळे, महेश खारकर, डॉ.शरद कुलकर्णी, संजय विटेकर, महेशराव खारकर, ईश्वर घोडके, विवेक सोन्नेकर, प्रा.संभाजी रोडगे, प्रा.जय बोराडे, अशोक कांबळे, पूरुषोतम कुलकर्णी, जयश्री सोन्नेकर, भाग्यश्री किर्तनकार, संध्या फुलपगार, अनया ढाकणे, आर्या ढाकणे, राम गायकवाड, रामराव बोबडे आदिंची उपस्थिती होती. वाचन लेखन चळवळ वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने शहरातील शारदा विद्यालय व के.बा.विद्यालय यांना ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ भेट दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news