29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरलातूर आगार व्यवस्थापकास लाच स्विकारताना पकडले

लातूर आगार व्यवस्थापकास लाच स्विकारताना पकडले

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाच्या लातूर आगाराचे लाचखोर आगार व्यवस्थाकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने २ हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या बाबत अधिक माहीती अशी, तक्रारकर्ते हे लातूर आगारात चालक असून त्याचे अर्जित रजा व रजा रोखे मंजूर केल्या कामी लातूर आगाराचे व्यावस्थापक बालाजी अडसुळे वय ५० वर्षे रा. कॉईल नगर लातूर, यांनी त्यांचे कडे २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

सदरील लाचेची २ हजार रूपयेची रक्कम पंचा समक्ष सोमवार दि. २२ रोजी स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून लाचखोर आगार प्रमुख अडसुळे यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत शिवाजीनगर पोलीसाच्या हवाली केले आहे. सदरची सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलीस उप अधिक्षक संतोष बर्गे, पो.नि. भास्कर पुल्ली, पो.नि.अन्नवर मुजावर पोह.फारूक दामटे, भिमराव अलुरे,शाम गिरी, पोकॉ. शिवशंकर कच्छवे, रूपाली भोसले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, दिपक कलवले,गजानन जाधव अदींनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR