अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम; महिनाभरात १,८५४ गुन्हे; २०.४२ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करत पोलिसांनी जुलै महिन्यात मोठी धडक मोहीम राबवली. पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शाहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एकूण १,८५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २० कोटी ४२ लाख ६४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेदरम्यान गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ४८ गुन्हे, महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत २९०, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत १,२९२, शस्त्र अधिनियमांतर्गत ४४ आणि इतर कायद्यांनुसार १८० गुन्हे नोंदविण्यात आले. एकूण २,४१८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

कारवाईचा आढावा घेतल्यास गुटख्यावरील कारवाईत ४८ गुन्हे नोंदवून सुमारे १.३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45

Latest news