आव्हई शिवारात गांजाची लागवड; दोघांवर गुन्हा दाखल

पूर्णा : पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हई शिवारातील गट क्रमांक १९९ व २०० मध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. शेताची पाहणी केली असता हिरवीगार गांजाची झाडे आढळून आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजपत्रित अधिकारी व दोन पंचांच्या उपस्थितीत ही झाडे उपटून त्यांचे वजन करण्यात आले. या कारवाईत काशिनाथ पांडुरंग पवार याच्याकडून ७ किलो ७६० ग्रॅम गांजा अंदाजे किंमत ३ लाख ८८ हजार रुपये, व्यंकटी बाजीराव पवार (दोघे रा. आव्हई) याच्याकडून २ किलो ३०० ग्रॅम गांजा अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींकडून मिळून १० किलो ६० ग्रॅम गांजा असा एकूण अंदाजे ५ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पो.ह. देविदास बुकरे यांच्या फिर्यादीवरू पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार रामकिशन काळे, गोविंद वड, देविदास बुकरे, रंगनाथ दुधाटे, हनुमान ढगे, संदीप चवरे व विलास बहुरे यांच्या पथकाने केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|आधी कचरा टाकला... मग त्याच कचऱ्याची केली स्वच्छता! नांदेड महापालिकेचा कारभार चर्चेत
01:23
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
11:55
Video thumbnail
Babasaheb Patil|खरीप पिकांच्या नुकसानीवर सरकारचा प्लॅन काय? सहकारमंत्र्यांनी दिलं उत्तर
01:37
Video thumbnail
Latur|जळकोटच्या स्वातंत्र्यसैनिकांचा निजामाविरोधातील लढा आजही इतिहासात जिवंत
02:50
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातून पाणी चोरीचा धक्कादायक प्रकार
04:05
Video thumbnail
Latur|डॉ. विजयकुमार यादव यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील श्रीगणेशाची आरती
01:39
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; हुतात्म्यांना मानाचा मुजरा
00:50
Video thumbnail
Renapur|हातभट्टीच्या अड्ड्यांवर रेणापूर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
01:46
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29

Latest news