ई-ऑफिस प्रणालीवरच टपालाचा स्वीकार

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये गेल्या एक ते दिड वर्षापासून ई-ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत दाखल होणा-या फाईलींचा निपटारा हा सदर प्रणालीवरच होत आहे. १ जुलै पासून सर्व पंचायत समिती स्तरावरून येणारे ऑफलाईन टपाल आता ऑनलाईन ई-ऑफीस टपालाद्वारे जिल्हा परिषदेत स्विकारले जात आहे. त्यामुळे कर्मचा-यांना जिल्हा परिषदेला फाईल घेऊन जाण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेने काळानुसार बदल स्विकारत सर्व विभागांमध्ये आता ई-ऑफिस प्रणाली लागू केली आहे. जिल्हा परिषदेत दररोज २०० च्यावर टापल, फाईली दाखल होतात. त्यासाठी विभागानुसार टपाल घेण्यासाठी कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांना जून मध्ये पत्र काढून कार्यालयीन कामकाजाचा निपटारा लवकर होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार ऑनलाईन व ई-ऑफीसद्वारे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद स्तरावरून विभागीय आयुक्त कार्यालयास करण्यात येणारा पत्रव्यवहारही ई-ऑफीसद्वारेच करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून ई-ऑफीसद्वारेच टपाल स्विकारल्या जात आहे. गोपनिय फाईल व काही फाईलचा अपवाद वगळता सर्व फाईल ई-ऑफीसद्वारेच स्विकारल्या जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या ई-ऑफीस मधील आवक-जावक विभागाला प्रत्येक विभागाने पत्रव्यवहार करने, तसेच आवक-जावक विभागाने तो पत्रव्यवहार संबंधीत विभागाच्या आवक-जावक विभागाला करावा. पंचायत समिती स्तरावरूनही असाच पत्रव्यहार पीडीएफ स्वरूपात करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे फाईल व फाईल मधील कागदत्र गहाळ होण्याच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. सदर फाईलचा प्रवास जलदगतीने होऊन कामाचा निपटारा होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषेदेत दाखल  झालेल्या  फाईलीवर काय कार्यवाही झाली. त्याची माहितीही ई-ऑफिस प्रणालीद्वारेच संबधित विभागाला कळविली ताणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news