29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनक्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट

क्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ एक अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात बांधले जात आहेत. नुकतीच रकुल प्रीत-जॅकी भगनानी, मीरा चोप्रा-रक्षित या जोडीने लग्नगाठ बांधली.

त्यांच्यानंतर आता कलाविश्वातील लोकप्रिय जोडी पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा ही जोडी लग्नाच्या बंधनात बांधली गेली आहे.

नुकतीच पुलकित आणि क्रितीने लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिल्ली एनसीआर येथील मानेसरच्या आयटीसी ग्रँड भारतमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली. १३ मार्चपासून ३ दिवस या जोडीचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू होते. अखेर १५ मार्च रोजी या जोडीने साताजन्माची गाठ बांधली. या लग्नासाठी क्रितीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर, पुलकितने लाईट ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR