Homeमुख्य बातम्याचिप्सच्या पाकिटाचा स्फोट; चिमुकल्याचा डोळा निकामी

चिप्सच्या पाकिटाचा स्फोट; चिमुकल्याचा डोळा निकामी

भुवनेश्वर : वृत्तसंस्था
चिप्सचे पॅकेट फुटल्यामुळे चिमुकल्याचा डोळा निकामी झाला. एका चिप्सच्या पॉकेटमुळे मुलाची दृष्टी गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यातून ही अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे चिप्सच्या पॅकेटच्या स्फोटाने एका आठ वर्षांच्या निष्पाप मुलाचं आयुष्य कायमचं बदललं. टिटलागड पोलीस स्टेशन परिसरातील शागरघाट गावात झालेल्या या दुर्घटनेत एका मुलाने आपल्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गमावली आहे.

पीडित लब हरपाल याचा मुलगा आहे. गावातील एका दुकानातून त्याने चिप्सचे पॅकेट घेऊन घरी आला. तेव्हा मुलाची आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. शेगडी सुरु असताना, हा मुलगा हातात चिप्सचं पॅकेट घेऊन शेगडीजवळ गेला. अचानक, त्याच्या हातातून ते पॅकेट निसटलं त्यानंतर ते पॅकेट आगीच्या संपर्कात आलं आणि मोठ्या आवाजात त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की, मुलाच्या चेह-यावर त्याचा फटका बसला. या स्फोटात मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी चिप्स उत्पादक कंपनीविरुद्ध तितलागड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR