जि. प. सत्ताधा-यांची प्रशासनावर पकड नसल्याने विकास ठप्प  

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक होऊन जिल्हा परिषदेत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि अपक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. लोकनियुक्त पदाधिकारी पदावर बसुन ६ महिन्यांचा काळ लोटला. परंतु, जिल्हा परिषदेतील सत्ताधा-यांमध्ये प्रत्येकजण नेता आहे. त्यामुळे कोणीच कोणाचे ऐकत नाही. परिणामी सत्ताधा-यांची प्रशासनावर पकड नसल्यामुळे विकास कामांचे तीनतेरा झाले आहेत. स्थायी समितीच्या सभागृहाला जळमटं लागली असून दस्तूरखुद्द जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या सौ. आशाताई भिसे यांना हातात झाडू घ्यावा लागला.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा होती. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या सौ. आशाताई भिसे स्थायी समितीच्या सभागृहात गेल्या होत्या. परंतु, स्थायी समितीच्या सभागृहाला मोठ्या प्रमाणात जळमट लागलेली, सभागृहात झाडूसुद्धा लावलेला नाही. सर्वत्र कचराच कचरा, पिण्यासाठी पाण्याचीसुद्धा सोय नाही, अशी सभागृहाची परिस्थिती पाहूण सौ. आशाताई भिसे यांची स्वत: हातात झाडू घेतला.
गेल्या ६ महिन्यांत सत्ताधा-यांनी त्यांना मिळालेला अधिकाराचा वापर केला नाही. परिणामी ग्रामीण जनता विकासापासून वंचित राहात आहे. जिल्हा परिषदेतील एकाही विभागाचा कारभार निटपणाने हाकला जात नाही. त्यामुळे योजनांचा फायदा जनतेला मिळत नाही. त्यासोबत अनेक अक्षेपार्  गोष्टी घडत आहेत.  जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषि, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा यासह सर्वच विभागांचा कारभार मनमानीपणे सुरु आहे. सत्ताधारी मात्र अकार्यक्षमपणे हे सर्व पाहात आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपातही गोंधळ आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे, शाळा खोल्यांचे बांधकाम अर्धवट आहे, मुलींच्या शौचालयांची अवस्था बिकट आहे, शौचालय आहे तर पाणीच नाही, अशी अवस्था आहे. लातूर जिल्ह्यात पाऊस नाही. जल व्यवस्थापनाच्या योजनांना गती देणे अपेक्षीत असताना त्याबाबत काहींच निर्णय घेतला गेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन या दोन विभागात गोंंधळाचे वातावरण आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:42
Video thumbnail
Latur|एसटीचा प्रवास करण्यापूर्वी हे तपासा; अन्यथा भरावे लागेल पूर्ण तिकीट!
03:44
Video thumbnail
Latur|हेल्मेट मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात; महामार्गावर कडक तपासणी
02:48
Video thumbnail
Nanded Accident|नांदेडमध्ये भरधाव पिकअपने स्कुटीस्वार तरुणीला दिली धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
01:00
Video thumbnail
Nanded Congress Protest|राहुल गांधींवर ॲट्रॉसिटी गुन्हा; नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
03:06
Video thumbnail
Latur|स्वस्त हेल्मेटच्या नादात जीव धोक्यात! लातुरात डुप्लिकेट हेल्मेटचा पर्दाफाश
03:57
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘नो हेल्मेट, नो एक्सक्यूज’! आजपासून थेट कारवाई
05:43
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
01:48:18
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16

Latest news