जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ९६३ शेतक-यांना १५९ कोटींचा निधी प्राप्त

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील २२ हजार ९६३ पात्र शेतक-यांसाठी तब्बल १५९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८ हजार ५८० शेतक-यांसाठी १२२ कोटी ७१ लाख ५५ हजार ४९ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित प्राप्त रक्कम ही राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील पात्र शेतक-यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात आली असून, अद्याप रक्कम न मिळालेल्या उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. तो निधी मिळताच संबंधित शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ज्या शेतक-यांची कर्जे पूर्णपणे माफ होऊन खाती बेबाकी झाली आहेत, अशा शेतक-यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांना लवकरच आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज वाटपाचा लाभ दिला जाणार आहे. शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र शेतक-यांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८९४ गावांमधील ५४ हजार ३८८ शेतक-यांचा समावेश आहे.  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ हजार ३९७ आणि राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे १८ हजार ९९१ शेतकरी सभासदांचा त्यांच्या विशिष्ट क्रमांकासह या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी जिल्ह्यातील ४० हजार ९ (७३.५६ टक्के) पात्र शेतक-यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अद्याप १४ हजार ३७९ पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.
आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांची नावे पात्र शेतक-यांच्या यादीत समाविष्ट आहेत, त्यांनी विनाविलंब जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक, प्रद्ध यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आवश्यक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40

Latest news