चाकुर : प्रतिनिधी
चाकुर तालुक्यातील मौ. डोंग्रज येथील ग्रामपंचायतने कामामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी चाकुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मौ. डोंग्रज गावाला मिळणा-या विविध शासकीय योजनांचा उपयोग गाव विकासासाठी न करता त्या निधीची कामे न करताच सदरचा निधी हडप केलेला आहे. तसेच जी काही कामे थातूर-मातून केली आहेत. त्याचा उपयोग गाव विकासासाठी झाल्याचे दिसून येत नाही. वित्त आयोगाचा जवळपास ५० टक्के निधी ग्रामपंचायतीने जाणुन बुजून हडप केला आहे. गावातील विकास कामे न करताच शासनाचा निधी हडप केला आहे. दि. ४ जुन २०२६ रोजी ४,१९००० रुपये निधी उचलेला आहे. माहिती अधिकार देताच दि. १५ ऑगस्ट रोजी कामे सुरु केली आहेत. घाई गडबडीत युद्धपातळीवर कामे संपवली जात आहेत. त्यामुळे सदरील कामांची गुणवत्ता शुन्य आहे.
डोंग्रज ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी माधव केरबा सूर्यवंशी हे डोंग्रज ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत आहेत. सदरील कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायतला मिळणा-या विविध प्रकारच्या निधीचा अपव्यय संगनमताने केला आहे. खोट्या ग्रामसभा व खोट्या कामांचे फोटो सराकरी यंत्रणेला दाखल केलेले आहेत. एकही फोटो जी.पी.एस. कॅमे-यातून घेतलेला नाही. खोटे रेकॉर्ड तयार करण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही. तेव्हा गटविकास अधिकारी यांनी डोंग्रज ग्रामपंचायतीने आजतागायत केलेल्या विविध कामांचा उद्देश सफल झाला का?, याचे मुल्यमापन करावे, शासकीय निधीच्या खर्चाची चौकशी करुन संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, बळीराम कांबळे, प्रमोद देवणे, प्रमोद कासार, बाजाजी जाधव, वसंत नागपूरे, वृषभ जाधव, योगेश नागपूरे, कोंडीबा कुंभारे, लक्ष्मण देवणे, शिवाजी नरवाडे, सीताराम मुंडे, उत्तम व्यंकट, बळीराम खपरले, शंकर कांबळे, अमोल जाधव, गजानन नरवाडे, पांडूरंग नरवाडे, व्ही. एम. निलमवाड, महेश मुंडे, पिराजी टिकलवाड, मारोजी पंदीलवाड, माधव आवळे, बाजाजी उडतेवार, कृष्णा चाकुरे, शिवाजी उडतेवार, बळीराम पंदीलवाड,
प्रणव कुंभारे, हाणमंत कोईलवाड, आकाश जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















