ढालेगाव, तारूगव्हाण बंधा-यातून पाण्याचा विसर्ग सुरू

परभणी : (सुधीर गो. बोर्डे)
 जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी ३६४.५ मि.मी. पाऊस होतो. त्या तुलनेत जिल्ह्यात या दोन महिन्यात ३०४.८ मि. मी. पाऊस झाला आहे. सरासरीच्या ८३.६ टक्के पाऊस झाला असला तरी अद्यापही जिल्हा तहानलेलाच आहे. निम्न दुधना, येलदरी या प्रमुख धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही.

त्यामुळे या दोन्ही धरणांच्या क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. दरम्यान पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण व ढालेगाव बंधा-यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. यातील ढालेगाव बंधा-याचे १ दार उघडून ६७९२ तर तारूगव्हाण बंधा-याचे १ दार सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून ८३००.३१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ३०४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये परभणी तालुका ३१०.१ मि.मी., पाथरी ३०१.८ मि.मी., जिंतूर ३४६.६ मि. मी., पूर्णा ३६९.१ मि. मी., पालम ३०५.३ मि. मी., सेलू २८३.८ . मि. मी., गंगाखेड ३१८.० मि. मी., सोनपेठ २३०.२ मि. मी. तर मानवत तालुक्यात २८३.४ मि. मी. पाऊस झाला आहे. यात सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या तालुक्यात पाऊस अद्याप म्हणावा तेवढा झाला नसला तरी या तालुक्याच्या शेजारीच असणा-या गोदावरी नदीला मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ढालेगाव बंधा-यात ७०.५२ टक्के पाणीसाठा
पाथरी पासून जवळ असलेला ढालेगाव बंधा-याची पाणीसाठा क्षमता १३.५० दलघमी. असून सद्यस्थितीत या ठिकाणी ९.५२ दलघमी. पाणीसाठा आहे. या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याची टक्केवारी ७०.५२ टक्के आहे. या बंधा-यातील पाण्याची आवक पाहता या ठिकाणच्या बंधा-याचे गेट नंबर ५ उघडण्यात आले असून त्याद्वारे ६७९२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गाकडे आहे. त्यामुळे जायकवाडीतून होणारी पाण्याची आवक लक्षात घेता गोदारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ढालेगाव बंधा-यात देखील पाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरणे पाथरी, मानवत तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.

तारूगव्हाण बंधा-यात ९२.०९ टक्के पाणीसाठा
पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा दि.१० ऑगस्ट रोजी ९२.०९ टक्के भरला आहे. या बंधा-यातील पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असणारी पाण्याची आवक पाहता सोमवारी दुपारी २ वाजता बंधा-याचे एक दार उघडून गोदावरी नदी पात्रात ८३००.३१ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. येणा-या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होऊ शकते. तरी कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा लघु पाटबंधारे विभाग, परभणीकडून देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news