पोलिसांसाठी ‘ट्राफिक बुथ’ उभारले; वापर कधी?

लातूर : प्रतिनिधी
कधी नव्हे ती लातुरातील वाहतूक शाखा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सक्रीय झाली आहे. वाहतूक शाखेकडून सातत्याने विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीत सुधारणा करण्याबरोबरच वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठीही नवीन प्रयोग करण्यात येत आहेत. शहरातील प्रमुख १० चौकांमध्ये ‘ट्रॅफिक बुथ’ उभारले जात आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक चौकांत ‘ट्रॅफिक बुथ’ची उभारणी झाली आहे. परंतु, अद्यापही ‘ट्रॅफिक बुथ’चा वापर सुरु करण्यात आलेला नाही. ‘ट्रॅफिक बुथ’चा वापर करण्यासाठी वाहतूक शाखेकडून मुहूर्त काढला जाणार आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी आणि अधिक प्रभावी कामकाजासाठी अत्याधुनिक ‘ट्रॅफिक बुथ’ उभारण्यात येत आहेत. यापैकी ५ ते ६ महत्वाच्या चौकांमध्ये हे बुथ प्रत्यक्ष साकारले आहेत. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये चौकात थांबून वाहतुकीला शिस्त लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अतिउष्णता, मुसळधार पाऊस आणि कडक्याच्या थंडीतही त्यांना रस्त्यावर उभे राहावे लागते. मात्र आता हे ‘ट्रॅफिक बुथ’ उभारले जात असल्यामुळे पोलिसांच्या या अडचणी दुर होणार आहेत.
शहरातील राजीव गांधी चौक, पीव्हीआर चौक, संविधान चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (नवीन रेणापूर नाका), जूना रेणापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गरुड चौक, जुने गुळ मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक (अशोक हॉटेल चौक), दयानंद गेट या १० ठिकाणी  ‘ट्रॅफिक बूथ’ उभारले जात आहेत. यापैकी ५ ते ६ चौकांमध्ये ‘ट्रॅफिक बूथ’ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. ‘ट्रॅफिक बूथ’ चौकातील रस्त्यांवर १ ते २ फुट उंचावर कट्टा तयार करुन उभारले जात आहेत. या उंचीमुळे येणा-या-जाणा-या प्रत्येक वाहनचालकाला कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलिस दुरुनच स्पष्ट दिसू शकतील. हाताचे इशारे अगदी शेवटच्या वाहनचालकांपर्यंत सहज दिसण्यास मदत होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news