बनशेळकी तलाव जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता

उदगीर : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उदगीर नगरपरिषदेमार्फत बनशेळकी तलाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्षा स्वाती हुडे व मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम उत्साहात पार पडली.
शहराला दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. कालांतराने केंद्राच्या परिसरात वाढलेले गवत, झुडपे, तसेच फ्लॉक्युलेटर (जलशुद्धी प्रक्रिया केंद्र) मध्ये साचलेला गाळ आणि भिंतींवर जमा झालेले शेवाळ यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होती. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने नियोजनबद्ध विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील वाढलेले गवत व झुडपे काढण्यात आली. वीज पुरवठ्यासाठी असलेल्या डीपी परिसरातील धोकादायक वाढलेली झाडे छाटण्यात आली. तसेच फ्लॉक्युलेटरमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून टाकण्यात आला आणि भिंतींवर साचलेले शेवाळ साफ करण्यात आले. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी दिपक मोरे, गटनेते अनिल मुदाळे, मनोज पुदाले, सय्यद ताहेर, स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, पाणीपुरवठा सभापती सय्यद रेश्मा खतिजा इमरोज, महिला बालकल्याण सभापती सय्यद खुर्शीदबी हनिफसाब, नगरसेवक सचिन हुडे, विजय निटूरे, अमर सूर्यवंशी, धिरज कसबे, चाऊस उमर यांच्यासह नरसिंग शिंदे, विरकुमार अंबरखाने बांधकाम अभियंता गुरुप्रसाद लोणारे, अनिल कुरे, एनयुएलएमचे  शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, विशाल गुडसुरकर, प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता सिद्दीकी मिसबाह, व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ज्ञ शिवशंकर मटके, शहर समन्वयक प्रफुल आदावळे आदी उपस्थित होते.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील कटके यांच्यासह कर्मचारी सय्यद नासेर, शकील व इतर कर्मचारी, अग्निशमन प्र.विभाग प्रमुख संजय क्षीरसागर विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या स्वच्छता निरीक्षक सरूबाई चव्हाण, प्रभारी स्वच्छता निरीक्षक सिकंदर शेख, विनोद रंगवाळ, उमाकांत गंडारे तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पुण्यात माऊलींच्या पालखीचे अलोट उत्साहात स्वागत; दगडूशेठ गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी!
01:05
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
31:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
34:01
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33

Latest news