25.5 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeभाजपने नाकारले; लखन मलिकांना अश्रू अनावर

भाजपने नाकारले; लखन मलिकांना अश्रू अनावर

वाशिम : प्रतिनिधी
लोकसभेनंतर अनेक बदल झाले आहेत. काही हक्काच्या उमेदवारांना घरी बसवण्यात आले. तर ज्यांच्या नावाची खात्री नव्हती त्यांना लॉटरी लागली. यंदाच्या निवडणुकीत पक्षांना बंडोबाचं मोठं आव्हान असे वेगळं सांगायला नको. वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांना पक्षाने असाच दे धक्का दिला. त्यांचे तिकीट कापण्यात आले.

भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले. वाशीम मतदारसंघात पक्षाने अशीच भाकरी फिरवली. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून लखन मलिक यांनी चार वेळा भाजपसाठी विजय खेचून आणला आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले.

वाशीम मतदारसंघात त्यांच्याऐवजी नवीन चेहरा देण्यात आला. लखन मलिक यांना डालवून पक्षाने शाम खोडे यांना उमेदवारी जाहीर केली. खोडे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. ही माहिती मिळताच लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. पक्ष निष्ठा असताना आपल्याला का डावलण्यात आले असा सवाल करीत या अश्रूंची फुले नव्हे, तर भाले होणार असा इशाराही त्यांनी दिला.

लखन मलिक बंड करणार?
आपण भाजपचे निष्ठेने काम केले. आमदारकीच्या चार कालावधीत आपण कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणतीही संपत्ती जमा केली नाही. पक्षाचा विचार वाडी वस्तीपर्यंत पोहचवला. आपल्यावर जनतेचा विश्वास होता, म्हणून त्यांनी चार वेळा निवडून दिले. त्यामुळे आता कार्यकर्ते, पदाधिका-यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR