मनपातर्फे आयोजित सायकल रॅलीस मोठा प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि. ६ जून रोजी शहरात एका भव्य ‘सायकल रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण रोखणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उपक्रमात ‘लातूर सायक्लिस्ट ग्रुप’च्या सदस्यांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. सायकल रॅलीचा शुभारंभ लातूरचे  महापौर जयश्रीताई सोनकांबळे  आणि लातूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात  केली व स्वत:ही या उपक्रमात सहभाग  नोंदवून उपस्थितांचा उत्साह  वाढवला.
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. रॅली लातूर शहर महानगरपालिका, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर. जे. कॉम्प्लेक्स, औसा रोड येथून यू-टर्न घेउन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, ५ नंबर चौक येथून यू-टर्न घेउन समारोप लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात करण्यात  आला.  पर्यावरण वाचवण्याचा आणि आरोग्याप्रति सजग राहण्याचा संदेश देणा-या या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. लातूरकरांनीही या सायकल रॅलीचे स्वागत करत महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मोठे कौतुक केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news