मुंबई : प्रतिनिधी
मोठ्या प्रमाणात प्रसाद खरेदी करणा-या भाविकांनीही खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोदक अन् मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक, पेढे आणि विविध मिठाई खरेदी केली जात आहे.
मात्र, वाढत्या दरांमुळे खरेदीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पूर्वी पाच ते दहा किलो प्रसाद घेणारे भाविक आता दोन ते तीन किलोवर आले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी किलोभर मिठाई घेणारे ग्राहकही पावशेर किंवा अर्धा किलो खरेदी करत आहेत.
मिठाईतील भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांवर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने व्यावसायिकांमध्येही खबरदारीचे वातावरण आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमुळे मिठाई उत्पादक दर्जेदार साहित्य वापरण्यावर भर देत आहेत.
२७ हजार रुपये प्रति किलो मोदक
सोने, चांदीचा वर्ख असलेल्या मोदकाला भाविकांची मागणी वाढली आहे. सोन्याचा वर्ख असलेले मोदक २७ हजार रुपये प्रति किलो तर चांदीचा वर्ख असलेले मोदक हे २ हजार रुपये किलोने नाशिकमध्ये उपलब्ध असून आपल्या लाडक्या गणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाविकांची सोने, चांदीच्या मोदकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
















