रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत दिया, इशिका ठरल्या विजेत्या

अहिल्यानगर : प्रतिनिधी
उत्तर युरोपातील एस्टोनिया देशात आयोजित जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजित अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी ऐतिहासिक यश संपादन करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. जगभरातील ७० देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत दोघींनी प्रथम क्रमांक पटकावून जागतिक विजेतेपद मिळवले.

मूळची अहिल्यानगरची असलेली दिया सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला दियाने विकसित केलेला मोबाईलद्वारे ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट. हा रोबोट पेरणी, फवारणी व नांगरणी यांसारखी अनेक शेतीकामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. तसेच तापमान, हवामानातील बदल व वातावरणातील आर्द्रता मोजण्याची क्षमताही त्यामध्ये आहे.

एस्टोनिया येथे झालेल्या या जागतिक स्पर्धेत दहा विविध गटांतील सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. अमेरिका, युरोप व आशिया खंडातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संघ सहभागी झाले असतानाही नावीन्यपूर्ण संकल्पना, अचूक सादरीकरण व आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व इशिका यांनी सर्व फे-या यशस्वीरीत्या पार करत अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले. दिया छाजेड हिने सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. अन्न निर्माण करणा-या शेतक-यांचे कष्ट कमी करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल, याच उद्देशाने हा रोबोट तयार केला. या उल्लेखनीय यशाबद्दल दोघींना मिळून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, लवकरच सुवर्णपदक देण्यात येणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news