शनीचा चंद्र ‘टायटन’वर बर्फाळ समुद्र!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
शनी ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या ‘टायटन’बाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. नव्या संशोधनानुसार, टायटनच्या गोठलेल्या पृष्ठभागाखाली जीवसृष्टीला पूरक ठरू शकेल, असा ‘चिखलयुक्त बर्फाचा’ समुद्र असू शकतो. या शोधामुळे परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संशोधनाचे मुख्य लेखक फ्लेविओ पेट्रिक्का यांच्या मते, शनीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडल्यानंतर सुमारे १५ तासांनी टायटनचा आकार बदलण्यास सुरुवात होते. यावरून असे दिसून येते की, टायटनच्या अंतर्गत भागाची रचना यापूर्वी समजल्या जाणा-या रचनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हा वेगळा निष्कर्षच तिथे पाण्याचा अंश किंवा अर्धवट वितळलेला बर्फ असल्याचे सिद्ध करणारा मोठा पुरावा ठरला आहे. पाणी हा जीवसृष्टीचा मुख्य आधार असल्याने, टायटनवरील हा शोध भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

१९९७ मध्ये प्रक्षेपित झालेल्या ‘कॅसिनी’ यानाने शनीच्या कक्षेत २० वर्षे घालवून महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. कॅसिनीने टायटनचा आकार ‘लवचिक’ असल्याचे आणि तो शनीभोवती फिरताना काहीसा दबला जात असल्याचे टिपले होते. शास्त्रज्ञांच्या मते, जर टायटनच्या आत पाण्याचा साठा असेल, तरच शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या पृष्ठभागावर असा ताण येऊ शकतो.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक बाप्टिस्ट जर्नाक्स यांनी सांगितले की, ‘हे पृथ्वीवरील महासागरांसारखे नसून आर्क्टिकमधील समुद्रातील बर्फ किंवा जमिनीखालील जलथरांसारखे असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तिथे कोणत्या प्रकारची जीवसृष्टी असू शकते आणि त्यांना आवश्यक पोषक तत्त्वे कशी मिळतात, यावर होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news