१५ दिवसांत कांद्याच्या दरात तिप्पटीने वाढ

लातूर : प्रतिनिधी
कांद्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. १५ दिवसांपूर्वी २० रुपयांना किलोभर मिळणारा कांदा आता थेट ६० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याच्या दरात तिप्पटीने वाढ झाली. परिणामी गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. कमी पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला  असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
दरवाढीमुळे आता कांदा खरेदी करताना नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहे. बहूतांश ग्राहक गरजेपुरताच कांदा खरेदी करताना दिसत आहेत. किलोऐवजी अर्धा किलो किंवा कमी प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. बाजारात कांदा कमी आल्याने मागणी पूर्ण करणे अवघड झाले आहे. उपलब्ध कांद्याच्या गुणवत्तेनूसार दरातही फरक पडत आहे. पुढील काही दिवसांत बाजारात कांद्याची आवक वाढली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आवक सुधारल्यास दरात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या लातूरकरांसाठी कांदा हा पुन्हा महागाईचा विषय ठरला आहे. २० रुपयांवरुन ६० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दराने सर्वसामान्यांचे बजेट बिघडवले असून बाजारातील आवक वाढण्याची प्रतीक्षा ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही लागली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका बाजारातील आवकेला बसत आहे. कमी पावसामुळे काही भागांतील कांदा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी नवीन कांदा बाजारात पुरेशा प्रमाणात दाखल झाला नाही. पूर्वी हजारो पोत्यांमध्ये होणारी आवक आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक कमी असताना मागणी कायम असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.
लातूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज हजारो पोती कांदा बाजारात दाखल होत असल्याने पुरवठा मुबलक आणि दर आवाक्यात होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या बाजारात दररोज केवळ २०० ते २५० पोती कांदा दाखल होत आहे. आवक घटलेली असताना मागणी कायम असल्याने कांद्याचे दर वाढले असून किरकोळ बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:42
Video thumbnail
Latur|एसटीचा प्रवास करण्यापूर्वी हे तपासा; अन्यथा भरावे लागेल पूर्ण तिकीट!
03:44
Video thumbnail
Latur|हेल्मेट मोहिमेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात; महामार्गावर कडक तपासणी
02:48
Video thumbnail
Nanded Accident|नांदेडमध्ये भरधाव पिकअपने स्कुटीस्वार तरुणीला दिली धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू
01:00
Video thumbnail
Nanded Congress Protest|राहुल गांधींवर ॲट्रॉसिटी गुन्हा; नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
03:06
Video thumbnail
Latur|स्वस्त हेल्मेटच्या नादात जीव धोक्यात! लातुरात डुप्लिकेट हेल्मेटचा पर्दाफाश
03:57
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘नो हेल्मेट, नो एक्सक्यूज’! आजपासून थेट कारवाई
05:43
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
01:48:18
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16

Latest news