लातूर : प्रतिनिधी
आठरा पगड जातीला एकत्र करून जुलमी राजवटीच्या विरुद्ध स्वराज्याचे स्वप्न पाहून, रयतेच्या सुखासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करून प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली. शौर्य, न्याय, पराक्रम यामुळे सारे जग ज्यांच्याकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते, असे विश्व भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी स्वत: व छत्रपती संभाजी महाराज यांची शिताफीने आग्रा येथून औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेतली. म्हणून हा दिवस विश्व सन्मान दिन म्हणून आग्रा येथे साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार शाहू महाराज, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व इतर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे परिपत्रक विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा, नवी दिल्ली यांच्या वतीने मुख्य आयोजक डॉ. जनार्दन पाटील यांनी प्रसिद्ध दिले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बी. के. सिंह आग्रा, डॉ. जनार्दन पाटील, डॉ. ए. एस. सचान, डॉ. संजीव कुमार, जय शंकरराव हैदराबाद, बन्सीधर नाईक, डॉ. अखिलेश कुमार, रामदास पवार, अँड. उदय गवारे, प्रा. शिवाजी उगिले, प्रा. दत्ता सोमवंशी, सुपर्ण जगताप, अँड. सुशील सोमवंशी, विश्वंभर भोसले आदींनी केले आहे.
















