27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeमनोरंजन‘ओ रोमियो’ चित्रपट हाउसफुल्

‘ओ रोमियो’ चित्रपट हाउसफुल्

मुंबई : प्रतिनिधी

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तावर रिलीज झालेला ‘ओ रोमिओ’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत २० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘ओ रोमिओ’ चित्रपट १3 फेब्रुवारी २०२६ ला रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटाने ‘व्हॅलेंटाईन डे’ ला किती कोटी कमावले जाणून घेऊयात.

‘ओ रोमियो’ चित्रपटाने पहिल्या शनिवारी ला बक्कळ कमाई केली आहे शाहिद कपूरच्या चित्रपटाने दुस-या दिवशी १२.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केल आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘ओ रोमियो’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण २४६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

परदेशातून २ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, चित्रपटाचे जगभरात एकूण २६.६ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. ‘ओ रोमियो’ चित्रपटाचे बजेट जवळपास १२०-१५० कोटी रुपये आहे. ‘ओ रोमियो’ चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसोबतच नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी हे कलाकार देखील झळकले आहेत. चित्रपट ऍक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. ‘ओ रोमियो’ चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR