नांदेड : प्रतिनिधी
शहरातील गणेश नगर भागातील वाय पॉईंटच्या वळणावर भारताविकातील कारचालकाने तेथील दुचाकी ऑटो व शटरला ९ मे च्या रात्री धडक दिली. त्यात जीवित हानी झाली नाही मात्र ऑटो व शटर चे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील बाबानगर येथील रहिवासी पाटील नामक व्यक्ती ९ मे च्या रात्री गणेशनगर वाय पॉईंट येथून भरधाव वेगात कार घेऊन जात होता. वाय पॉईंटच्या वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तेथील दुचाकी, ऑटो व शटरला जोरदार कारची धडक बसली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काचमांडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारचालक पाटील याला ताब्यात घेतले होते. या अपघातात ऑटो व शटर चे नुकसान झाले असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

