ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वरच्या दिंडीने वेधले लातूरकरांचे लक्ष

लातूर : प्रतिनिधी
शहरातील गावभाग परिसरात असलेल्या ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या सांगता दिनी ‘श्री’ च्या नगरप्रदक्षिणेसाठी दिंडी काढण्यात येते. याही वर्षी काढण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वरच्या दिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीत पारंपारिक वेशभूषेतील महिलांसह वारकरी, तरुण, तरुणी व भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. पारंपारिक वेशभूषेतील अश्वांवर रुढ झालेल्या तरुणी व बाल वारक-यांनी आपल्या सहभागाने या दिंडीची शोभा वाढवली होती.
शहरात गावभाग परिसरात असलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहासाठी शहरासह परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याही वर्षी या सप्ताहाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सप्ताहाच्या सांगता दिनी ‘श्री’ ची पालखीची नगरप्रदक्षणा काढण्यात येते. यानिमित्ताने श्री रामलिंगेश्वर मंदिरापासून दि. ३१ जुलै रोजी सकाळी या दिंडीचा शुभारंभ झाला. खडक हनुमान, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, औसा हनुमानमार्गे या दिंडीचा समारोप श्री रामलिंगेश्वर मंदिराजवळ करण्यात आला. या दिंडीत भाविकांनी मोठ्या उत्स्फुर्तपणे  सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे पारंपारिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कळस घेवून भक्तीभावाने दिंडीत सहभाग घेतला होता. तसेच हरिरामाचा गजर करणा-या वारक-यांसह बाल वारकरी व अश्वावर रुढ झालेल्या तरुणी या दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. ढोल, बँडपथक तसेच लातूर शहर परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
नगर प्रदक्षिणा मार्गावर व्यापा-यांसह नागरिकांनी दिंडीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढून दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गंजगोलाई परिसरातील व्यापा-यांनी दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. दिंडीदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news