व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणारी टोळी जेरबंद

नांदेड : प्रतिनिधी
सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन एका व्यक्तीकडून १ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पदार्फाश केला. या प्रकरणात ४ महिलांसह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी एका महिलेने एका व्यक्तीला मोबाईलवर संपर्क साधून ड्रायव्हरची आवश्यकता असल्याचे सांगून भाग्यनगर परिसरातील बेलानगर येथे बोलावले. फियार्दी घटनास्थळी पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या ४ महिलांनी व एका पुरुषाने त्यांना जबरदस्तीने एका घरात नेले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील शर्ट काढून बनियनवरील अवस्थेत फोटो व व्हिडिओ मोबाईलद्वारे चित्रित करण्यात आले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत १ लाखांची खंडणी मागण्यात आली.

आरोपींनी फियार्दीच्या हातातील सुमारे ८ ग्रॅम वजनाची १.२० लाख किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व तेथून पसार झाले.घटनेनंतर फियार्दीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार व स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन अल्पावधीतच आरोपी शिला सुनील भदरगे (रा. बेला नगर ), इंदुबाई विठ्ठलराव बा-हाटे (रा. संतोष नगर ), सुनिता रमाकांत सोनकांबळे (रा. सप्तगिरी कॉलनी ), रेखा रामचंद्र इंगोले (रा. देगाव चाळ) व अमन मारुती कांबळे (रा. पाली नगर) यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ स्कुटी, १ ऑटो , ४ मोबाईल फोन तसेच सोन्याची अंगठी असा एकूण ५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले यांच्या पथकाने केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45

Latest news