नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे आणि आता भारतावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी संभाव्य भीती लक्ष्यात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काही महत्वपूर्ण आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतात सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होइल, अशी शंका ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया जेम अॅप ज्वेलरी कौन्सिलने व्यक्त केली आहे. भारतात सोने म्हणजे धार्मिक संस्कृती आणि त्याला स्वत:च असे वेगळे महत्व आहे. लोकांना सोने खरेदी बंद केले तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. मात्र, राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांचं आवाहन त्याला आमचे समर्थन आहे. पण लोकांनी सोनं खरेदी न करणे कठीण आहे.
कारागीरांना सर्वाधिक फटका
ज्वेलरी उद्योगाचं जीडीपीमध्ये सात टक्के योगदान आहे. महाराष्ट्र आणि पश्मिम बंगाल येथील कारागीरांना याचा सर्वाधिक फटका बसेल. देशात दरवर्षी ७०० टन सोन्याची आयात होते. युक्रेन रशिया वॉर दरम्यान युक्रेनच्या नागरिकांनी सोने विक्री करून स्वत:ला उभारले असेही ऑल इंडिया जेम अॅप ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सीलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले.
















