स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार; रॅकेटचा पर्दाफाश 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा (एएचटीयु) ने केलेल्या धडक कारवाईत स्पा सेंटरच्या आड सुरू असलेले देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक ताब्यात घेण्यात आला असून मालकासह दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
दि. २० जुलै रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस अमलदार लता गिरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंत्री प्लाझा कॉम्प्लेक्स, औसा रिंग रोड, लातूर येथील ‘नाईस स्पा’ या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरील जिल्हा व राज्यातून महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. ही माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात सदर ठिकाणी छापा टाकून स्पा सेंटरच्या आड सुरू असलेले देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले आहे.
तपासामध्ये स्पा सेंटरच्या माध्यमातून बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत पुरुष ग्राहकांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये कलम १४३(३)(५) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनैतिक व्यवसाय (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी आदित्य जगन रसाळ यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन रावसाहेब काळुंके याचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला शासकीय महिला निवारा ग्रह लातूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील आदेशासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, महिला पोलीस अमलदार लता गिरी, सुधानती वंगे, पोलीस अंमलदार सदानंद योगी, सचिन मुंडे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे हे करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news