आठवले यांच्यासह केंद्रामधील ६ मंत्र्यांची नववर्षात अग्निपरिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारमधील काही मंत्र्यांना आगामी वर्षात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. २०२६ मध्ये किमान सहा मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांना मंत्रिपद गमवावे लागू शकते. निवडणुकांच्या दृष्टीनेही २०२६ महत्त्वाचे असून, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आणि राज्यसभेच्या तब्बल ७५ जागांवर निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, जॉर्ज कुरियन, रवनीत सिंह बिट्टू, हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मा यापैकी चार मंत्री भाजपचे, एक जेडीयूचा आणि एक भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. संबंधित पक्षांनी पुन्हा राज्यसभेवर न पाठवल्यास, कॅबिनेटमधून त्यांची गच्छंती निश्चित मानली जाते.

एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांचाही कार्यकाळ याच वेळी संपतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपची स्थिती भक्कम असल्याने चार जागा भाजप, तर एक-एक जागा शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकते. विरोधक एकत्र आले तर एक जागा त्यांच्या वाट्याला जाऊ शकते.

भाजपने यापूर्वी रामदास आठवले यांना दोनदा राज्यसभेत पाठवले आहे. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने, भाजप तिसरी संधी देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news