कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक ;मराठवाड्यात ट्रॅक्टर मोर्चा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या ‘बळिराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढत सरकारचा विरोध केला आहे.

आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा, पण शेतक-यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणारच! असे थेट आणि रोखठोक आव्हान अंबादास दानवे यांनी सरकारला दिले आहे. प्रशासनाकडून होणा-या संभाव्य कारवाईला किंवा गुन्ह्यांना न घाबरता आज मराठवाड्यातील सर्व ८ ही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठाकरे गटाचा भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ धडकत असल्याचे ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. विद्यमान सरकारची ही योजना कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे.

ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी सरकारने शेतक-यांवर लादल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणत्याही अटींशिवाय शेतक-यांची कर्जमुक्ती केली होती. मात्र, सध्याच्या सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, त्यांनी शेतक-यांची फसवणूक केली आहे.

यापूर्वी पक्षाने निदर्शने आणि ‘रास्ता रोको’सारखी आंदोलने केली होती; मात्र आता शेतक-यांच्या कष्टाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर थेट रस्त्यावर आणून सरकारला जाग आणली जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31
Video thumbnail
Pandharpur Accident|पंढरपूर-म्हसवड महामार्गावर भीषण दुर्घटना;पिकअप विहिरीत कोसळून14 भाविकांचा मृत्यू
01:45
Video thumbnail
Nagesh Ashtikar ON Opration Tiger|आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबतच - नागेश आष्टीकर #marathilivenews
02:34
Video thumbnail
Latur News|स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर? प्रशासकीय इमारतीची दयनीय अवस्था
02:56
Video thumbnail
Latur News|रविवारीही मनपा खुली; विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रशासन धावले
03:36
Video thumbnail
Latur Accident|लातूर जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच; बुधोडा जवळ भीषण धडक, 3 ठार 17 जखमी
01:14
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17

Latest news