36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeक्रीडाकांगारुंचा भरवसा दैवावर

कांगारुंचा भरवसा दैवावर

  डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेतील ३०व्या सामन्यात यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले या सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसांकाचाच खेळ पाहायला मिळाला. त्याने पकडलेल्या एका झेलमुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे, असे म्हणता येईल. त्याने पकडलेला कॅच पाहून सगळेच चकित झाले.

या स्पर्धेत अनेकदा उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आता त्यामध्ये निसांकाचेही नाव जोडले गेले त्याने संघाला ‘सुपर ८’ मध्ये पोहोचण्यासाठी त्याचा हा झेल संघासाठी तर विशेष होताच, त्याचबरोबर या स्पर्धेतील तो सर्वोत्तम झेल ठरला श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा, मार्श-हेड यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्या दोघांच्या विकेटनंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव अडखळला. जोश इंग्लिस आणि मॅक्सवेल यांनी संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला.

त्यामुळे श्रीलंकेची चिंता वाढताना दिसली.ऑस्ट्रेलियाच्या १६ व्या षटकांत श्रीलंकेला मॅक्सवेलची विकेट घेण्याची संधी होती, मात्र दुष्मंता चामीराच्या त्या षटकातील दुस-याच चेंडूवर निसांकाने त्याचा सोपा झेल सोडला. त्यामुळे श्रीलंकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. या घटनेचा परिणाम मात्र निसांकाने होऊ दिला नाही .
त्याने पुढच्याच षटकात त्याची भरपाई केली. हेमंताच्या १७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप खेळला. निसांकाने मात्र ही संधी जाऊ दिली नाही आणि हवेत सूर मारत तो चेंडू झेलला. मॅक्सवेल २२ धावा (१५ चेंडू) करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने १६ षटकात ४ विकेट्स गमावत १६० धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर मॅक्सवेल उभा होता. तेव्हा वाटले ऑस्ट्रेलिया २००च्या पुढे जाईल. निसांकाच्या त्या झेलमुळे ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स नंतर पडतच राहिल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात १८१ धावा केल्या.

त्यांनी चांगली सुरुवात केली असली तरी, मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले मॅक्सवेलची विकेट किती महत्त्वाची होती. पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. यापूर्वी, त्यांना झिम्बाब्वेकडूनही पराभव पत्करावा लागला तर संघाने आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला तथापि, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.. कर्णधार मिचेल मार्श सामन्यानंतर म्हणाला, ‘आम्हाला वाटले होते की आम्ही स्पर्धात्मक धावसंख्या उभारली आहे. परंतु ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली, त्यामुळे आम्ही कदाचित १५-२० धावा गमावल्या. शेवटच्या टप्प्यात आम्ही आमचा मार्ग गमावला आणि श्रीलंकेने चांगली गोलंदाजी केली, आता सगळं देवाच्या हाती आहे. आम्ही झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंडचा सामना आशेने पाहत आहोत.’ श्रीलंकेने १८२ धावांचे लक्ष्य फक्त १८ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.

या विजयाचा शिल्पकार सलामीवीर पथुम निस्सांका होता. त्याने ५२ चेंडूत नाबाद १०० धावा करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फटकावले. त्याच्या फलंदाजीला तोडच नाही त्याची बॅट सरळ सुरेख होती आणि त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्याला कुसल मेंडिसने चांगली साथ दिली (३८ चेंडूत ५१ धावा) दोघांमधील भागीदारीने सामना एकतर्फी बनवला. या विजयासह श्रीलंकेने ‘सुपर-८’ फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला आता झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. कर्णधार मार्शने कबूल केले की खेळाडू निराश आहेत. आणि आता ‘सुपर ८’ मध्ये प्रवेशासाठी सर्व दैवावर भरोसा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR