लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरुन देशातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभुमीवर नीट पेपरफुटी विरोधी आंदोलन कृती समिती आणि कॉकरोच जनता पार्टीसह विविध संघटनांच्या वतीने दि. २० जून रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान राजीनामा द्या…, राजीनामा…, अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच नीट पीडित विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये नूकसान भरपाई आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने करावी, या मागण्यांचाही समावेश होता. या आंदोलनात तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला होता. शासनाच्या शैक्षणिक धोरणावर या वेळी भाष्य करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्रोही भगतसिंग कलापथकाच्या वतीने क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. ‘ऐ भगतसिंग तू जिंदा है’ तसेच ‘सांगा आम्हाला बिर्ला-बाटा’ यांसारख्या जनजागृतीपर गीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तरुणांच्या या सांस्कृतिक सादरीकरणामुळे आंदोलनाला विशेष ऊर्जाही प्राप्त झाली.
धरणे आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील, शिक्षण तज्ज्ञ रमेश बिरादार, अॅड. उदय गवारे, कॉ. भोसले, संजय मोरे, रामकुमार रायवाडीकर, शाम वरयाणी, दत्ता सोमवंशी, सोहम कवठेकर, डॉ. बी. आर. पाटील, शिवाजी कांबळे, गणेश कल्लुरकर, संजय व्ययवहारे, अभिषेक शिंदे, इस्माईल सय्यद, नागेश कांबळे, दीपक यादव, मुज्जफर शादुल, प्रयोजन जाधव, आयान सय्यद, हुर्दळे, ओमसाई कांबळे, सतीश हनुमंत, वैभव धोंडगे, देवानंद सोनकांबळे, अरविंद जावध, पृथ्वीराज रविंद्र चव्हाण, गोपाळ चिकाटे, धर्मराज पाटील, बालाजी शिंदे, विठ्ठल माने, एम. व्ही. देशपांंडे, कविश्वर माडिले, ज्योतीराम पवार, वाघंबर उबाळे, दत्ता माळी, मोहसीन खान, वलीसाहेब शेख, याकुब पठाण यांच्यासह असंख्य युवक, नागरिक सहभागी झाले होते.
















