चोरीचा गुन्हा; ११ वर्षांपासून फरार २ आरोपींना अखेर बेड्या

लातूर : प्रतिनिधी
वर्षानुवर्षे फरार राहून कायद्याला चकवा देणा-या आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तसेच फरार आरोपींच्या अभिलेखांचा सखोल आढावा घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय यश पोलीसांना मिळाले आहे. पोलीस ठाणे भादा येथे २०१५ मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
दि. ५ ऑगस्ट २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ च्या मध्यरात्री दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील परिसरातील चंदनाच्या झाडाचा गाभा अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेला होता. चोरीस गेलेल्या चंदनाची किंमत सुमारे ५ हजार रुपये होती. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ६ ऑगस्ट २०१५ रोजी पोलीस ठाणे भादा येथे गुरनं. ६६/२०१५, कलम ३७९ भादंवि तसेच भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र नितीन गोरख राऊत (वय ४८ वर्षे, रा. सर्जापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) व रामचंद्र उर्फ राम धर्मराज माळी (वय ५० वर्षे, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते.
विशेष मोहिमेदरम्यान पोलीसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे तसेच विविध ठिकाणी पडताळणी करून या दोन्ही आरोपींचा माग काढला. अखेर त्यांना शोधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरवणी दोषारोपपत्रासह त्यांना मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे, पोहेकॉ फिरोज शेख, कांबळे, पोना/पाटील, पोअं/मोरे यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news