गोल्डके्रस्ट हायच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात ‘नवरस’मधून मानवी भावभावनांचे प्रभावी दर्शन

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या गोल्डक्रेस्ट हाय, यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला १५ वा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नवरस-नऊ भावना, एक मानवता’हा कार्यक्रम लातूर शहरातील स्वर्गीय दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह, मार्केट यार्ड, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बी. एस.वाकुरे, डॉ. महेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र  अभिवादन केले व दीपप्रज्वलनानंतर गोल्ड क्रेस्ट हाय लातूरच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सव नवरस ची सुरुवात झाली. यावेळी गोल्ड क्रेस्ट हाय मधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच अन्य ऐच्छिक उपक्रमाची माहिती तसेच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, याबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव कथन विषद करणारी चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. यावेळी उपस्थित प्राचार्य, शिक्षकवृंद, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनि गोल्ड क्रेस्ट हाय लातूरच्या बाल गोपाळ,विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक सोहळ्यात उपस्थित केलेल्या विविध कला गुणांचे कौतुक केले.
यावेळी प्राचार्य डॉ. वाकुरे म्हणाले की, आपण सर्वजण भारतात राहतो.अनेक भाषा, अनेक सण, समारंभ, वेगवेगळ्या संस्कृती असल्या तरी आपण भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. १९८० ते १९९० मधील जी पिढी होती त्याची कलर प्रिंट म्हणजे आजची जेन झी आहे. आज आपण पाहतोय की आजच्या जेन झी ला वैद्यकीय अभ्यासक्रम असो की अभियांत्रिकी प्रवेश हा शासकीय महाविद्यालयातच मिळावा असे वाटते आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता, क्षमता ही एकसारखी नसते त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याने कोणते शिक्षण घ्यावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र आपल्या पाल्यांना द्यावे.
आपल्याकडे आजवर अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अनेक शोध लावले त्यांच्या शोधाचे कौतुक केले जाते. पण तो शोध लावताना त्यांना कितीवेळा अपयश आले किती काळ त्यासाठी घालवावा लागला याचाही विचार आपण करायला हवा जो केला जात नाही. जपानचे चित्रकार पॅगलो पिकासो यांच्यासोबत घडलेली घटना विद्यार्थ्यांना सांगितली ज्यात त्यांनी ३० सेकंदात रेखाटलेले चित्र, त्या मोबदल्यात डॉलर मध्ये मिळालेला मोबदला आणि यासाठी त्यांनी घेतलेली चित्रकारितेतील ३० वर्षाची मेहनत या गोष्टीचा समावेश होता. शेवटी आपल्याला कोणते शिखर गाठायचे आहे ते सर्वप्रथम निश्चित करून करिअर मधील त्या यशाच्या उपलबाधिकरिता प्रयत्न करावेत असा सल्ला विद्यार्थ्यांना देत कवी. वी.दा.करंदीकर यांच्या असे जगावे दुनिये मध्ये आव्हानांचे लावून अत्तर,नजर रोखुनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेच्या ओळी ऐकवत सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा गोल्डक्रेस्ट हायचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. ‘नवरस’ या संकल्पनेतून मानवी भावभावना आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा १५ वा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. यावेळी गोल्ड क्रेस्ट हाय लातूरच्या मुख्याध्यापिका हिना सिंग, प्रा.प्रेमा यांच्यासह शिक्षकवृंद,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोट प्रकरणात बंदूक घर मालकाला अटक | दोन कुरियर चालक आरोपी
02:25
Video thumbnail
Latur News|गांधी चौक पोलिसांनी शोधले १४ हरवलेले मोबाईल | CEIR पोर्टलची मदत
02:23
Video thumbnail
Latur News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कडक कारवाई; 80% सवलतीचा आज शेवटचा दिवस
01:52
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29

Latest news