जाधव यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य प्रेरणादायी

निलंगा : प्रतिनिधी
सहशिक्षक अनिल जाधव यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी काढले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोली भंगार येथील सहशिक्षक अनिल जाधव यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ ३१ मे रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एस. जी. पाटील (गटविकास अधिकारी), चंद्रहास म्हेत्रे (गटशिक्षणाधिकारी), उद्योजक उदय पाटील, डॉ. विवेक सोताडेकर, संभाजी नवघरे, धनंजय उजनकर, दिलीपराव धुमाळ, अरुण सोळंके, आनंद जाधव व एस. बी. मुळे हे उपस्थित होते. तृप्ती अंधारे म्हणाल्या की, अनेक संघर्षांवर मात करून अनिल जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आई-वडिलांच्या संस्कारांची जाणीव ठेवत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे कार्य केले आहे. शिक्षक व्यवसाय हा सर्व नोक-यांपेक्षा आनंददायी असून विद्यार्थ्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रतापराव जाधव व शांताबाई जाधव या त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनिल जाधव व वैशाली जाधव यांचा सपत्नीक मानपत्र व भेटवस्तू देऊन शाळा, केंद्र व मित्रपरिवाराच्या वतीने गौरव करण्यात आला.
एस. जी. पाटील, संभाजी नवघरे, श्रुती जाधव, ज्ञानदेव बरमदे, धनंजय उजनकर, उदय पाटील व चंद्रहास म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. अनिल जाधव यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात शरद झाडके यांनी संघर्षातून यश मिळविणा-या आणि आई-वडिलांच्या भावनांची कदर करणा-या व्यक्तींची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम. एम. जाधव यांनी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news