विहिरीत उडी मारली आणि वर आलाच नाही 

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील पाटोदा बु येथील एक २२ वर्षीय युवक गावाशेजारीस असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता. त्याने पोहायची शेवटची उडी मारू, असे म्हणत विहिरीत उडी मारली, आणि तो बाहेर आलाच नाही रात्री ७ वाजता त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
जळकोट तालुक्यातील रमजान बोंडुंगे (वय २२) हा युवक आपल्या मित्रांसमवेत गावाशेजारील असलेल्या एका शेतक-याच्या शेतातील विहिरीमध्ये दि २ जून रोजी दुपारी ३ च्या दरम्यान पोहायला गेला होता.  या युवकास पोहताही येत होते. सर्वांचे पोहणे झाल्यावर आता एक शेवटची उडी मारू व गावाकडे जाऊ असे रमजानने सांगितले. त्याने उंचावरून उडी मारली मात्र तो बाहेर आलाच नाही मित्र थोडा वेळ वाट बघितली मात्र तो बाहेर न आल्यामुळे याची माहिती घरी दिली. यावेळी पाहुणेमंडळी तसेच गावातील नागरिक त्या विहिरीकडे धावले. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला परंतु लवकर बाहेर काढता आले नाही .
  यानंतर विशेष पथकास पाचारण  करण्यात आले परंतु माळहिप्परगा येथील शेतकरी पांडुरंग तिडके यांनी विहिरीमध्ये उडी मारून सदरील बुडालेल्या युवकास बाहेर काढले. विहिरीतून बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान विहिरीच्या अवतीभोवती गावक-यानी मोठी गर्दी केली होती . त्याच्या आईला तो एकुलता एक मुलगा होता. रमजानने शेवटची उडी मारली आणि यामध्ये त्याच्या जीवनाचा शेवट झाला. उडी मारल्यानंतर तो गाळामध्ये फसून बसला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या अकाली निधनाने  संपूर्ण पाटोदा गावावर शोककळा पसरली आहे .  सदरील युवकाचा मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी जळकोट येथील  ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news