देवणी तालुक्यात मशागतीचे दर ३०० रुपयांनी वाढले

देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यात खरीप हंगाम तोंडावर आल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शेतीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून ४२ अंश सेल्सिअस तापमानातही शेतकरी पहाटेपासून आपल्या कुटुंबासह शेतात राबताना दिसत आहेत मात्र तालुक्यात सध्या पेट्रोल ११३.१७ व डिझेल ९९.८३ रुपये प्रति लिटर दर वाढल्याने व इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सध्या ग्रामीण भागात तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली असल्याने, इंधनाची तीव्र कमतरता भासत असल्यामुळे शेती मशागतीच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, शेतक-यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. देवणी बोरोळ जवळगा आदी परिसरात खरीपपूर्व शेतीची लगबग सुरू झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, पिवळा, बाजरी, मका आदी पिकांच्या पेरणीपूर्व मशागत करून तयारीसाठी शेतकरी दिवस-रात्र शेतात राबताना दिसत आहेत. शेतातील बांध दुरुस्त करणे, जमिनीतील पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी नाली काढणे, जमिनीतील काडीकचरा काढून स्वच्छ करणे तसेच मशागतीची प्राथमिक कामे पूर्ण करण्यासाठी शेतक-यांची सध्या धावपळ सुरू आहे. मात्र डिझेल दरवाढ आणि वेळेवर इंधन उपलब्ध न होण्यामुळे ट्रॅक्टर व कृषी यंत्रांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मशागतीचे दर प्रति एकर सरासरी ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असल्याने बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी कमी वेळेत यंत्राद्वारे कामे करीत आहेत. ट्रॅक्टरने रोटाव्हेटर मारणे, नांगरणी करणे, पाळी मारणे, मोगडा मारणे, कुळव मारणे पेरणी यंत्र आदी सर्व कृषी कामांचे भाडे वाढल्याने लहान व मध्यम शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. तसेच इंधन टंचाईबरोबर ग्रामीण भागात मजूर टंचाई ही अधिक तीव्र झाल्याने उपलब्ध मजूरांकडून वाढीव मजुरीची मागणी केली जात आहे. अगोदरच शेतकरी खते, बी बियाणे, आणि औषधांच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झाले आहेत.
शेतक-यांवर आर्थिक भार पडत आहे. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून मालवाहतूक व्यवसायावरही झाला आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने शेतीसाठी लागणा-या सर्व साहित्यांच्या बाजारभावात वाढ करण्यात आली आहे.  शेती मशागतीचे गतवर्षीचे तौलानिक दर पाहता जुने, नवीन दरानुसार नांगरणी करणे २२००/ २५००, पाळी मारणे ८००/१०००, मोगडा मारणे ९००/१२००, तीरी मारणे १२००/१४००, रोटर मारणे १८००/२१००, सरी मारणे १२००/१४०० रुपये घेतले जात आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news