जळकोट : प्रतिनिधी
सध्या संपूर्ण राज्यभर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना, अशा विविध घरकूल योजना सुरू आहेत. यासाठी लाभार्थ्यांच्या वतीने रजिष्ट्रेशन करण्यात आले आहे. जळकोट तालुक्यात २०१६ ते २०२६ पर्यंत ८००० घरकुल मंजूर झाले आहेत. यापैकी जवळपास ५००० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे तर यावर्षी जळकोट तालुक्यात १९१४ घरकुले मंजूर झाली आहेत. त्याचे काम आता प्रगतीपथावर आहे .
जळकोट तालुक्यातील अतनूर, बेळसांगवी, बोरगाव, चेरा, चिंचोली, धामणगाव, ढोर सांगववी, डोंगरगाव, एकुरका खुर्द, गव्हाण, घोणसी, गुत्ती, हळद वाढवणा, हावरगा, होकर्ण, जगलपूर, करंजी, केकतशिंदगी, डोंगर कोणाळी, कुणकी, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द, माळहिपरगा, मंगरूळ , मरसांगवी, मेवापूर, पाटोदा बुद्रुक, पाटोदा खुर्द, रावणकोळा, शेलद्ररा, शिवाजीनगर तांडा, सोनवळा , सुलाळी, तिरुका, उमरदरा, उमरगा रेतू, विराळ, वडगाव, वांजरवाडा, येलदरा, रामपूर तांडा, येवरी या गावांमध्ये विविध घरकूल योजनेची कामे मंजूर झाली आहेत व ती कामे प्रगतीपथावर आहेत .
तालुक्यामध्ये २०२४-२५ व २६ या वर्षांमध्ये मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४८३६ एवढ्या घरांचे टार्गेट होते. ४७९५ रजिस्टेशन झाले आहे. ४५९७ लाभार्थ्यांचे जिओ टॅगिंग कम्प्लीट झाले आहे. या सर्व घरकूल ४३५९ जणांना पहिला हप्ता खात्यात जमा आहे. २३०७ जणांना दुसरा हप्ता तर ११८९ जणांना ३ रा हप्ता खात्यावर जमा झाला आहे तर ३७० जणांचे घरकूल पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजना अंतर्गत २०२४-२५ मध्ये २४२ घरकुल मंजूर झाले असून या २१७ जणांचे बँक अकाउंट तसेच आधार कार्ड अपडेट झाले आहे. २०४ जणांना पहिला हप्ता पडला तर १०६ जणांना दुसरा हप्ता पडला आहे तर ६० जणांना तिसरा हप्ता पडला तर एका घरकुलधारकास चौथा हप्ता पडला आहे. जवळपास २७ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
















