डान्सवरून अनन्या पांडे ट्रोल

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री अनन्या पांडेचा नवीन चित्रपट ‘चांद मेरा दिल’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असला, तरी त्यातील एका डान्स सीनमुळे अनन्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. २२ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अनन्याच्या भरतनाट्यम डान्सची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावर नेटक-यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

चित्रपटात अनन्या ‘चांदनी’ ही भूमिका साकारत आहे, जी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असण्यासोबतच एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये अनन्या डान्स करताना दिसत आहे, पण प्रेक्षकांना तिच्या मुद्रा आणि मुव्हज् अजिबात आवडलेल्या नाहीत. तिच्या या व्हायरल क्लिप्सवर अनेक युजर्सनी या डान्सला ‘रोबोटिक’ म्हटले आहे. ही भारतीय शास्त्रीय नृत्याची थट्टा असल्याचे अनेकांचे मत आहे. एक्स अकाऊंटवर एका युजरने लिहिले की, ‘भरतनाट्यमची घसरण २०० एडी मध्येच सुरू झाली होती आणि २०२६ मध्ये अनन्या पांडेने त्याचा अंत केला.’

मीम्सचा महापूर
या डान्स सीनवरून सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही युजर्सनी अनन्याच्या अभिनयावर आणि तिच्या ‘नेपोटीझम’ पार्श्वभूमीवरही टीका केली आहे. डान्समधील तांत्रिक चुका काढत एका अनुभवी नृत्यांगनेने याला ‘बेवकूफी’असे संबोधले आहे. मात्र, इतक्या टीकेनंतरही अनन्याच्या चाहत्यांनी तिची बाजू लावून धरली आहे. काही चाहत्यांच्या मते हा चित्रपट आणि त्यातील तो सीन कल्पक आहे आणि विनाकारण तिला लक्ष्य केले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
00:00
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00
Video thumbnail
IAS Rahul Kulkarni|लातूर मनपाला अखेर नवे आयुक्त; राहुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार!
02:04
Video thumbnail
Solapur|दुधनी बाजार समितीत चबुतरा वाद पेटला; ५ तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची माघार
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
03:07
Video thumbnail
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासाचा वारसा; लातूरला विभागीय आयुक्तालयाची गरज – आ. अभिमन्यू पवार
01:47
Video thumbnail
LIVE- विधान परिषद पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
02:24:19
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण
01:56:55
Video thumbnail
Nanded|"हिंमत असेल तर समोर या!" नागेश पाटील आष्टीकरांचा विरोधकांना इशारा
04:03
Video thumbnail
Latur|लातूर सिटी बसची पोलखोल! तपासणीत धक्कादायक त्रुटी
03:51
Video thumbnail
Latur|फिल्मी स्टाईल पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
02:19
Video thumbnail
Latur|जून संपला... पण पाऊस नाही! लातूरचा शेतकरी चिंतेत
05:24
Video thumbnail
HSRP NUMBER PLEAT|HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOची कारवाई सुरू
04:51
Video thumbnail
Breaking News|नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे; राजकीय वातावरण तापले!
01:26

Latest news