Homeलातूर‘दयानंद विज्ञान’ जेईई मेन्स परीक्षेत यश

‘दयानंद विज्ञान’ जेईई मेन्स परीक्षेत यश

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी व नीट अशा प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी झालेल्या जेईई मेन्स या दुस-या फेजच्या परीक्षेचा निकाल दि. २० एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. जेईई मेन्स ही परीक्षा वर्षातून दोन वेळेस घेतली जाते. दोन्ही परीक्षेपैकी ज्या परीक्षेत अधिक गुण मिळतील ते गुण प्रवेशासाठी ग्रा  धरले जातात. या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
त्यामध्ये रुद्राक्ष अग्रवाल या विद्यार्थ्याने ९९.७१ पर्सेन्टाइल मार्क मिळवून महाविद्यालयातून सर्व प्रथम क्रमांक, नंदिनी कुलकर्णी या विद्यार्थिनीने ९८.२९ पर्सेन्टाइल मार्क मिळवत व्दितीय तर आसिफ पठाण या विद्यार्थ्याने ९८.१६ पर्सेन्टाइल मार्कासह तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. या निकालामध्ये ९५ पर्सेन्टाइलपेक्षा जास्त गुण घेणारे १० विद्यार्थी आहेत. तसेच ९० पर्सेन्टाइलपेक्षा जास्त गुण घेणारे २४ विद्यार्थी आहेत. जेईई मेन्स परीक्षा १५९ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी जेईई अ‍ॅडव्हांन्ससाठी ६८ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या यशा बद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,  ललितकुमार शहा, रमेश राठी, रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, डॉ. चेतनजी सारडा, डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. बेल्लाळे एस. एस, उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे, आदी कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR