Homeपरभणीदौंड- मनमाड दुहेरीकरण कामांमुळे रेल्वे मार्गात बदल

दौंड- मनमाड दुहेरीकरण कामांमुळे रेल्वे मार्गात बदल

परभणी : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड- मनमाड रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत प्री-एनआय व एनआय कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी रेल्वे लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे खालील रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

दौंड- निजामाबाद दरम्यान धावणारी एक्सप्रेस दि.१० ते १५ मे दौंड- लातूर रोड, परभणी- हजूर साहिब नांदेड-निजामाबाद मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच निजामाबाद- पुणे एक्सप्रेस दि.१० ते १४ मे दरम्यान हजूर साहिब नांदेड- परभणी- लातूर रोड- दौंड मार्गे पुणे वळविण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड रेल्वे विभाग जनसंपर्क कार्यालयाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR