28.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीय विशेषधान्योत्पादन वाढले पण...

धान्योत्पादन वाढले पण…

देशात अन्नधान्य उत्पादन विक्रमी पातळीवर पोचलेले असताना अणि गोदामे धान्यांनी भरलेली असताना कुपोषणाची समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की धान आणि गहू या पिकांमध्ये लोह आणि जस्त यांसारख्या सूक्ष्म खनिज पोषक घटकांची घट झाली विषारी घटकांची वाढ झाली आहे. पोषक घटकांचे प्रमाण वाढण्याशी संबंधित अनुवांशिक वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घडत असल्याचे हा अहवाल सांगतो.

अलिकडेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालात धान आणि गव्हात लोह आणि जस्त यासारख्या सुक्ष्म खनिज पोषक तत्त्वांचा अभाव असल्याचे आणि विषाक्त तत्त्वांत वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. देशातील प्रमुख अन्नधान्यांमध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढण्यासंबंधी असलेल्या पारंपरिक पद्धतीकडे दुर्लक्ष केल्याने आवश्यक पोषणमूल्यांबाबत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. हरित क्रांतीच्या काळात पीक प्रजननासाठी झालेल्या संशोधनातून विकसित अर्धवट आणि खुजे पण उच्च उत्पन्न असलेल्या पिकांच्या तार्किकतेवर प्रश्न उपस्थित राहत आहेत. या अभ्यासाने धान्यांतील आर्सेनिक आणि अ‍ॅल्युमिनियमसारख्या विषाक्त तत्त्वांच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील वाढते कुपोषण अणि आजारांबाबत चिंता व्यक्त करत या संशोधनाने २०४० पर्यंत भारतीय लोकसंख्येत लोह आणि अन्य पोषक तत्त्वांचा अभाव राहिल्याने अ‍ॅनिमिया, श्वसन, हृदय आणि मस्कुलोस्केटेल सारख्या नॉन कम्युनिकेबल आजार बळावतील, असे संकेत दिले आहेत.

गेल्या पाच दशकांत कृषी उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. चांगले पिक येण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांनी अधिक उत्पादन येणारी अर्धवट आणि खुजे धान तसेच गव्हाचा विकास अणि पीकप्रजननासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. देशात अन्नधान्य उत्पादन विक्रमी पातळीवर पोचलेले असताना अणि गोदामे धान्यांनी भरलेली असताना कुपोषणाची समस्या उग्र रुप धारण होत असताना हा संशोधन अहवाल जारी झाला आहे. कुपोषण आणि अनारोग्याचा सामना करणा-यांचे प्रमाण आजही मोठे आहे. जगातील सर्वाधिक कुपोषित देशांच्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या अन्नसुरक्षा आणि पोषण अवलोकन २०२३ च्या अहवालात म्हटले की, २०२१ मध्ये सुमारे ७४.१ टक्के भारतीय कमी उत्पन्न कमी असल्यामुळे सकस आहार घेण्यापासून वंचित आहेत. एवढेच नाही तर आपल्यां देशात आजही सुमारे ८० कोटी नागरिकांना अन्नधान्न पुरवठा हा खाद्य सुरक्षा अधिनियमानुसार केला जात आहे.

ही आकडेवारी आश्चर्यकारक आहेच, त्याचबरोबर देशाचे कृषी धोरण, कृषी संशोधन, पिक उत्पादन यातील असणारी कमी गुंतवणूक, खतांचा चुकीचा वापर, मातीची ढासळणारी गुणवत्ता, खराब पाणी आणि मानवाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकते. अर्थात या अभ्यासाची व्याप्ती धान अणि गव्हापर्यंतच होती. पॉट चाचणीच्या माध्यमातून खनिज पोषण तत्त्व शोषून घेण्याबाबत अभ्यास करण्यात आला. रोपटी हे खनिज पदार्थ माती आणि पाण्यातून शोषून घेत असतात. या शोधाच्या निष्कर्षांना रोपट्यांची अनुवांशिकता आणि मेटाबॉलिक सिस्टमला थेटपणे जोडणे व्यवहार्य वाटत नाही. तसे घडले असते तर विषाक्त तत्त्व जसे क आर्सेनिक आणि अ‍ॅल्यूमिनियमला रोपट्यांनी अधिक प्रमाणात कसे शोषून घेतले असते? या निष्कर्षाची पडताळणी शेतक-यांनी शेतात करायला हवी.
प्रत्यक्षात पिक पोषण हा एक खूप महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीचा विषय असून त्याकडे आपण दुर्लक्ष केले आहे. पिकांच्या पोषणाबाबतीत निष्काळजीपणा दाखविल्याने १९८५ चा कायदा खते (अकार्बनिक, जैविक किंवा मिश्रण) नियंत्रण आदेश म्हणजेच फर्टिलायजर कंट्रोल ऑर्डर अ‍ॅक्ट असून त्यानुसार खतांचे उत्पादन, साठा, वितरण, विक्री, अंशदान आणि बाजार मूल्य यावर भारत सरकारचे नियंत्रण राहिल. या नियनामुसार भारत सरकार पिक पोषण करणारे मायक्रो न्यूट्रिटंटसारख्या नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅशियमव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुक्ष्म (मायक्रो) पोषक तत्त्वांना अनुदान देत नाही आणि प्रोत्साहनही नाही. पण स्वस्तात उपलब्ध होणा-या युरियाचा भरपूर वापर होत आहे. त्याचा फायदा झाला, पण पोषक तत्त्वांत घसरण झाली. ही उणिव दूर करण्यासाठी भारत सरकारने एप्रिल २०१० मध्ये खते तथाकथित पोषक तत्त्व आधारित अंशदान व्यवस्था सुरू केली. या आधारे फॉस्फरस आणि पोटॅशियमयुक्त नवीन खते शेतक-यांना कमी किंमतीत उपलब्ध होतील. शिवाय भारत सरकारने २०१५ रोजी राष्ट्रीय खत धोरणार्तंगत १०० टक्के कडुलिंबाचे आवरण असलेला युरिया बाजारात आणला. यानुसार युरियातील नायट्रोजन अधिक काळापर्यंत पिकांना मिळेल आणि माती अणि हवेतील प्रदूषण रोखणे शक्य राहिल, असे गृहित धरण्यात आले.

खतांसंदर्भातील ‘एफसीओ’ हा १९८५ चा कायदा आहारातील पोषक तत्त्व कमी होण्यास कारणीभूत आहे. म्हणूनच खतांचा संतुलीत वापर केल्यास मातीतील सुक्ष्म पोषक तत्त्वांची होणारी संभाव्य हानी रोखली जाईल आणि तेव्हाच भारतातील जनता कुपोषणांच्या संकटापासून वाचू शकेल. मातीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यातील सुक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता दूर करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्याची गरज आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एफसीओ’ कायदा मागे घेऊन सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म पोषक तत्त्वांसाठी एक व्यापक कायदा आणण्याची गरज आहे. खतांच्या दर्जात सुधारणा करणारा, नव्या उत्पादनाला प्रोत्साहित करून नायट्रोजन वापराबाबतची दक्षता (एनयूई) वाढविणारा, लीचिंग अणि पाण्याचे प्रदूषण कमी करणारा, नायट्रिकरण रोखणारा, पोषक तत्त्वयुक्त मातीत सुधारणा करणारा आणि सुक्ष्म खजिन पोषक तत्त्वयक्त युरिया उपलब्ध करून देणारा कायदा असावा. नव्या कायद्याच्या मदतीने खतांचा संतुलित वापर करता येईल अणि मातीत सुक्ष्म खजिन पोषक तत्त्वांचंी उपलब्धता आणि रोपट्यांत सुक्ष्म खजिन पदार्थ शोषून घेण्याची क्षमता वाढविता येणे शक्य आहे.

-भगीरथ चौधरी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR