‘नंदादीप’च्या विद्यार्थिनींचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चापोली येथील नंदादीप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी यंदा पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. शाळेच्या प्रांगणात आणि परिसरातील झाडांना राख्या बांधून ‘झाडे जगवा, जीवन वाचवा’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात हा अनोखा सोहळा साजरा केला. रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची कामना करते परंतु या परंपरेला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजगृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरातील विविध वृक्षांना पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू लावून, औक्षण करून आणि सुंदर, पर्यावरणपूरक राख्या बांधून केली. विशेष म्हणजे, याच दिवशी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ असल्याने शारीरिक आरोग्यासाठी जसा खेळ महत्त्वाचा आहे, तसेच उत्तम आरोग्यासाठी शुद्ध आणि हिरवेगार पर्यावरणही तितकेच गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या रक्षाबंधनामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह दिसून आला. शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी विद्यार्थिनींच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले असून, यातून ख-या अर्थाने निसर्गाशी आपले नाते घट्ट होण्यास मोठी मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण करणे गरजेचे आहे. आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून झालेली या रोपांची जोपासना भविष्यात वनात रूपांतरित होईल. यावेळी शाळेचे संचालक शिवानंद स्वामी, संचालिका निकिता स्वामी, शितल होनराव, वैष्णवी होनराव, रूपाली शंकरे, अनुराधा येनगे, आकांक्षा येनगे, हजराबी देशमुख, मेघा बेद्रे, नगीना शेख, पूजा बिडवे, स्वप्ना भोसले आदी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news