पांढरवाडी तलावावरील पाणी उपसा अखेर बंद

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पांढरवाडी तलावातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी तहसील प्रशासन व पाटबंधारे विभाग व महावितरणने धडक कारवाई केली आहे. तलावातून शेतीसाठी सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा बंद करण्यात आला असून संबंधित वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करून पाणी उपशासाठी वापरण्यात येणा-या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पांढरवाडी तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. तलावातील उपलब्ध पाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याने येरोळ, पांढरवाडी, हनमंतवाडी व जांभळवाडी या गावांच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे कारवाई करत तलावातून होणारा शेतीसाठीचा पाणी उपसा थांबविला. पाणी उपसा करणा-या विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे तलावातील उर्वरित पाणीसाठा पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान पांढरवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून शेतीसाठी अनधिकृत पाणी उपसा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पथकात मंडळ आधिकारी नवनाथ खंदाडे, तलाठी डी. बी. हाळे, आकाश आलुरे, कोतवाल भागवत चिंचोलकर, पाठबंधारे विभागाचे एस. आर. म्हैसवाड, आर. सी. पांचाळ यांचा समावेश होता. पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता तलावातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news