१७ लाख ९० हजार ८ मतदारांची झाली नोंदणी

लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (एसआयआर) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ लाख ९० हजार ८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार तयार करण्यात आलेली ही प्रारूप यादी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रांवर कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्याच्या ँ३३स्र२://’ं३४१.ल्ल्रू.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या प्रारूप मतदार यादीनुसार लातूर जिल्ह्यातील २ हजार १४७ मतदान केंद्रांवर एकूण १७ लाख ९० हजार ००८ मतदारांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये ९ लाख ४० हजार २०० पुरुष, ८ लाख ४९ हजार ७७८ महिला आणि ३० इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
२३४-लातूर ग्रामीण: ३६३ मतदान केंद्रांवर १ लाख ५७ हजार २६८ पुरुष, १ लाख ३८ हजार ७९७ महिला व १ इतर असे एकूण २ लाख ९६ हजार ०६६ मतदार आहेत. २३५-लातूर शहर: ३८९ मतदान केंद्रांवर १ लाख ७२ हजार ९३२ पुरुष, १ लाख ६४ हजार ८६९ महिला व १५ इतर असे एकूण ३ लाख ३७ हजार ८१६ मतदार आहेत. २३६-अहमदपूर: ३७६ मतदान केंद्रांवर १ लाख ६२ हजार ४२२ पुरुष, १ लाख ४५ हजार ४२३ महिला व १ इतर असे एकूण ३ लाख ०७ हजार ८४६ मतदार आहेत. २३७-उदगीर: ३६० मतदान केंद्रांवर १ लाख ४९ हजार ९७९ पुरुष, १ लाख ३७ हजार २०९ महिला व ८ इतर असे एकूण २ लाख ८७ हजार १९६ मतदार आहेत.
२३८-निलंगा: ३४७ मतदान केंद्रांवर १ लाख ५३ हजार ६३६ पुरुष, १ लाख ३७ हजार ४५८ महिला व ३ इतर असे एकूण २ लाख ९१ हजार ०९७ मतदार आहेत. २३९-औसा: ३१२ मतदान केंद्रांवर १ लाख ४३ हजार ९६३ पुरुष, १ लाख २६ हजार ०२२ महिला व २ इतर असे एकूण २ लाख ६९ हजार ९८७ मतदार आहेत.विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे गणक प्रपत्र प्राप्त झाले नाहीत, त्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांचे बीएलओ सहाय्यक यांच्यामार्फत पडताळणी करून २ लाख १४ हजार ४४२ मतदारांच्या प्रपत्रांवर  वल्लूङ्म’’ीू३ुं’ी  असा शेरा मारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ५१ हजार ७४५ मयत, १८ हजार ६१३ गैरहजर, १ लाख १८ हजार २१२ स्थलांतरीत, ४७० इतर आणि २५ हजार ४०२ इतर ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या मतदारांचा समावेश आहे. यामध्ये लातूर ग्रामीण ३४ हजार ४९२; लातूर शहर ४५ हजार ६६२; अहमदपूर ३४ हजार १४५; उदगीर ३३ हजार ५२०; निलंगा ३७ हजार २८८ आणि औसा २९ हजार ३३५ मतदारांचा समावेश आहे.
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व कार्यालये
२३४-लातूर ग्रामीण: उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर. २३५-लातूर शहर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, लातूर. २३६-अहमदपूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, अहमदपूर. २३७-उदगीर: उपविभागीय अधिकारी कार्यालय, उदगीर. २३८-निलंगा: उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा. २३९-औसा: उपविभागीय अधिकारी कार्यालय, औसा-रेणापूर.जर नागरिक किंवा मतदार, मतदार नोंदणी अधिका-यांच्या निर्णयावर असमाधानी असतील, तर त्यांना आदेशाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे अपील दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news