नांदेडात पुन्हा झाडाझडती

सीबीआयचे ३ ठिकाणी छापे, पालक, विद्यार्थ्यांची चौकशी
नांदेड : प्रतिनिधी
सीबीआयचे पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झाले असून, या पथकाने ३ ठिकाणी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ ठिकाणी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात २ विद्यार्थी आणि एका कुटुंबाची सीबीआयने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयच्या पथकाने ७ ते ८ तास चौकशी केली असून, त्यानंतर हे पथक लातूरला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने तपास वेगात सुरू केला असून, मिळालेली माहिती आणि धागेदो-यावरून सीबीआय विविध ठिकाणी छापे टाकून चौकशी करीत आहे. नांदेडमध्येही आज सीबीआय पथकाने तीन ठिकाणी धाडी टाकून संशयितांची कसून चौकशी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयने १३ जणांना अटक केली आहे. सीबीआयची धडक कारवाई सुरू असतानाच आज सीबीआयचे पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये धडकले.

नांदेडमधील शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीबीआने तपास केला. या प्रकरणात सीबीआयने दोन विद्यार्थिंनी आणि एका कुटुंबाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी चौकशी केलेल्या एका विद्यार्थिनीची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आल्याचे समजते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49

Latest news