पीकविमाप्रकरणी जनहित याचिका दाखल करावी 

लातूर : प्रतिनिधी
गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. त्यात लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचे अतोनात नूकसान झाले. शासनाच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत नूकसानीचे पंचनामे करुन ८० टक्के नूकसान झाल्याचा अहवाल या कार्यालयाने शासनाला सादर केला आहे. शिवाय स्वत: मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची पाहणी करुन हेक्टरी १७ हजार ५०० रुपये शेतक-यांना देण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही  लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी ५६ महसुल मंडळांवर आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने अन्याय केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पीकविमा प्रकरणी जनहित याचिका दाखल करावी, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे.
खरीप हंगाम-२०२५ लातूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी वेदनादायी ठरला. शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही शेतक-यांनी प्रसंगी कर्जाने पैसे काढून खरीप हंगामात पेरणी केली. बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजूरी यावर शेतक-यांचा मोठा खर्च झाला. पीकं हातातोंडाशी आली असताना अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत होत्याचे नव्हते झाले. शेत-शिवारात डोलत असलेले सोयाबीन गेले, एवढेच नव्हेतर शेत जमिनीसुद्धा खरडून गेल्या. प्रचंड नूकसान झाली. शासनाने तातडीने नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. संबंधीत यंत्रणेने पंचनामे केले. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याला भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीची पाहणी केली आणि शेतक-यांना हेक्टरी १७ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासनही अद्याप पुर्ण झाले नाही.
किमान पीकविमा तरी मिळेल या आशेपोटी जिल्ह्यातील शेतक-यांनी पीकविमा भरला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने लातूर जिल्ह्यातून ११८ कोटी रुपये पिकविम्याची रक्कम जमा केली. परंतु, पीकविमा ६० महसूल मंडळातील शेतक-यांना देण्याऐवजी केवळ ४ महसूल मंडळात १९ कोटी  रुपयांचा पीकविमा वाटला. ५६ महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वा-यावर सोडून आयसीआयसी लोबार्ड कंपनीने शेतक-यांचेच १०० कोटी रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01
Video thumbnail
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये भीषण दुर्घटना: ‘होटल फ्लोरिस स्टे’ला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू
01:29
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21

Latest news